नवी दिल्ली : दिल्लीपोलिसांनी एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळवून लावत पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या ९ एजंट्सना अटक केली आहे. हे संशयित दहशतवादी देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये मोठा कट रचत होते. दिल्ली आणि मुंबईसह देशातील मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला करणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता.
अटक करण्यात आलेले संशयित दहशतवादी दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील रहिवासी आहेत, तर काही जण परदेशी नागरिक देखील आहेत. अटक करण्यात आलेल्या लोकांचं मुंबई अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचंही समोर आले आहे. हे सर्व संशयित दहशतवादी 'ISI' च्या इशाऱ्यावर भारतात हल्ला करण्याचा प्लॅन करत होते.
शस्त्रं, ग्रेनेड्स आणि स्फोटकं जप्त
संशयित दहशतवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. हे सर्व संशयित ISI च्या सांगण्यावरून भारतात घातपात घडवण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रसाठ्यासोबतच पाकिस्तानमधून आणलेली स्फोटकं, ग्रेनेड्स आणि अनेक घातक शस्त्रं जप्त केली आहेत.
'या' महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ल्याचा होता कट
पॉवर प्लांट्स,
न्यूक्लियर प्लांट्स,
वीज केंद्र
विमानतळ
रेल्वे स्टेशन
पाकिस्तानमधून पाठवलेली स्फोटकं जप्त
पाकिस्तानमधून पाठवण्यात आलेली स्फोटकं पोलिसांनी वेळेत जप्त केली आहेत. यामध्ये सर्वात मोठी आणि गंभीर बाब म्हणजे, ISI भारताला हादरवण्यासाठी भारताच्याच नागरिकांचा वापर करत होती. जेणेकरून त्यांना बाहेरून (पाकिस्तानमधून) लोक पाठवण्याचा धोका पत्करावा लागणार नाही आणि त्यांचे नापाक मनसुबेही सहज यशस्वी होतील. परंतु, दिल्ली पोलिसांनी आता ९ दहशतवाद्यांना अटक केली आहे.